Jalgaon news

उध्दव ठाकरेंचा ४ मे रोजी जिल्हा दौरा जाहीर

Home
उध्दव ठाकरेंचा ४ मे रोजी जिल्हा दौरा जाहीर PDF Print E-mail
User Rating: / 1
PoorBest 
Written by ई ब्राईट मिडिया   
Wednesday, 17 April 2013 19:22

udhav

उध्दव ठाकरेंचा ४ मे रोजी जिल्हा दौरा जाहीर

 

जळगाव,दि.१७ - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यांच्या तारखेत व जागेत बदल झाला असुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे ५ मे ऐवजी ४ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांची जाहीर सभा सागर पार्क ऐवजी शिवतिर्थ (जी.एस.ग्राऊंड) येथे आयोजित करण्यात आली आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौरा करीत असुन त्यांच्या जिल्ह्याचा दौरा ५ रोजी जाहीर झाला होता. त्या संदर्भात शिवसेना पदाधिकार्यांची बैठकही झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा दौरा ५ ऐवजी ४ मे रोजी आयोजीत करण्यात आला असुन याची तमामशिवसैनिक व प्रेमींनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिवसेना उपनेते तथा माजी आ.गुलाबराव पाटील, शिवसेना प्रमुख किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांनी केले आहे.

 

 

Advertisement

Featured Links:
BannerPowered By Webstar

Sitemap

Home  Jalgaon News | Bhusawal News | Health Mantra | Life StyleBright Marriage | Search PartenerMy Abum | Contact Us Bright Jobs  |My Profile | My private page

 

All Right's Reserved  © ebrightmedia.com 2013

Google +