Jalgaon news

जैन स्पोर्टस् ऍकॅमीच्या बुद्धिबळपटू प्रतीक व भाग्यश्रीचा भवरलालजींकडून गौरव

Home
जैन स्पोर्टस् ऍकॅमीच्या बुद्धिबळपटू प्रतीक व भाग्यश्रीचा भवरलालजींकडून गौरव PDF Print E-mail
User Rating: / 2
PoorBest 
Written by ई ब्राईट मिडिया   
Saturday, 24 August 2013 18:21

maratha sanghजैन स्पोर्टस् ऍकॅमीच्या बुद्धिबळपटू प्रतीक व भाग्यश्रीचा भवरलालजींकडून गौरव

 

जळगाव दि. 24 (प्रतिनिधी) - इराण येथे नुकत्याच पार पडलेल्या यूथ चेस चॅम्पियनशिप २०१३ स्पर्धेत जैन स्पोर्टस् ऍकॅडमीची दत्तक बुद्धिबळपटू भाग्यश्री पाटील हिने ८ वर्षे वयोगटातून भारताचे प्रतिनिधीत्व करीत ब्लिट्झमध्ये सुवर्ण पदक तर रॅपीडमध्ये कांस्य असे दुहेरी पदके मिळविले.

 

या विजया नंतर प्रतिक व भाग्यश्री या दोहोंनी आपल्या जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भवरलालजी जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांची भेट घेतली. तिच्या यशाबद्दल आदरणीय भवरलालजी जैन यांनी कौतुक केले. या तुझ्या यशाबद्दल तुला काय पारितोषिक देऊ असे भवरलालजी जैन यांनी तिला विचारल्यावर तिने आपल्याला सायकल हवी असे सांगितले.

 

या चिमुरड्या खेळाडूस त्वरेने सायकल देण्यात आली. भाग्यश्रीने मिळविलेल्या सुवर्णपदकापेक्षा आपल्या आजोबांनी आपल्याला सायकलमुळे ती खूप आनंदी झाली. भाग्यश्रीचे वडील (प्रवीण पाटील) चांगले बुद्धिबळपटू होत. आपल्या वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणारा आणि भारताचे प्रतिनिधीत्व करणारा प्रतिकच्या पावलावर पाऊल ठेऊन त्याची धाकटी बहिण भाग्यश्री ही देखील वयाच्या तिसर्‍या वर्षांपासूनच बुद्धिबळ खेळू लागली.

 

तिला देखील जैन स्पोर्टस् ऍकॅडमीचे आर्थिक पाठबळ मिळाले. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी तिला दत्तक घेतले. भाग्यश्री वयाच्या सहाव्या वर्षी २०११ ला बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होऊ लागली. भाग्यश्रीसाठी देखील देश विदेशात स्पर्धांना जाणे, कोचचा खर्च इतर खर्च जैन स्पोर्टस्ने उचचला. त्यामुळे बुद्धिबळात तिला चांगली कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली. २०१२ मध्ये दिल्ली येथे एशियन स्कूल चेस चँम्पियनशिप स्पर्धेसाठी ती खेळली.

 

यात तिने रॅपिड साठी सुवर्ण, स्टॅण्डर्ड साठी रौप्य, ब्लिट्झसाठी कांस्य पदक तिने प्राप्त केले. २०१२ मध्ये तिला कॉमनवेल्थ खेळली. त्यात तिने रौप्य पदक मिळविले. २०१२ मध्ये श्रीलंकेत एशियन यूथ चेस चँम्पियनशिप स्पर्धेसाठी ती खेळली. रॅपिडमध्ये तिला रौप्य पदक मिळाले. २०१३ मध्ये एशियन युथ चेस चॅम्पियनशिप ८ वर्षे वयोगटासाठी ब्लिट्झ साठी सुवर्ण पदक आणि रॅपिडमध्ये कांस्य पदक मिळविले.

 

या दोघं भावंडांनी फक्त जळगावचे नव्हे तर खान्देशचा नावलौकीक आशियामध्ये वाढविला आहे. प्रतिक पाटीलचे देखील आदरणीय भवरलालजींकडून कौतुक इराण येथे पार पडलेल्या यूथ चेस चॅम्पियनशिप २०१३ स्पर्धेत जैन स्पोर्टस् ऍकॅडमीचा दत्तक बुद्धिबळपटू प्रतिक पाटील याने १८ वर्षे वयोगटातून भारताचे प्रतिनिधीत्व करीत ब्लिटस् स्पर्धेत रौप्य पदक मिळविले तर रॅपीड बुद्धिबळ स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला. त्याने नुकताच इंटर नॅशनल मास्टरचा पहिला नॉम मिळविला आहे. त्याची ग्रॅण्डमास्टर बनण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे.

 

इराण येथील आपल्या विजया नंतर प्रतिक प्रवीण पाटील जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भवरलालजी जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांना भेटला. त्याच्या यशाबद्दल आदरणीय भवरलालजी जैन यांनी कौतुक करीत त्याला महात्मा गांधीजींची प्रतिमा देत गौरव करण्यात आला.

 

खान्देशात अत्यंत चमकदार कामगिरी केलेल्या या बहिण भावंडांनी जळगाव आणि जैन स्पोर्टस् ऍकॅडमी व जळगावचे आशियामध्ये नावलौकीक मिळविला.२०१२ मध्ये श्रीलंकेत एशियन यूथ चेस चँम्पियनशिप स्पर्धेत तो खेळला. यात त्याने भारतीय संघासाठी सुवर्णपदक मिळविण्यासाठी चांगली कामगिरी करून दाखविली शिवाय तो आशिया खंडात पाचव्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. २०१२ मध्येच नवीदिल्ली येथे एशियन स्कूल चेस चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. यात त्याने दुहेरी कामगिरी केली. स्टॅण्डर्डमध्ये सुवर्ण आणि ब्लिट्झला देखील सुवर्ण पदक त्याने भारताला मिळवून दिले. 


 

 

Advertisement

Featured Links:
BannerPowered By Webstar

Sitemap

Home  Jalgaon News | Bhusawal News | Health Mantra | Life StyleBright Marriage | Search PartenerMy Abum | Contact Us Bright Jobs  |My Profile | My private page

 

All Right's Reserved  © ebrightmedia.com 2013

Google +